बातमी कट्टा:-विषारी सापाने दंश केल्याने दोन्ही चिमुकल्या सख्या बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि 18 रोजी घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दोंडाईचा येथून जवळच असलेल्या वणी येथे गणेश दीपचंद भिल हे वास्तव्यास आहेत. गणेश भील व त्यांचे परिवार घरात झोपलेले असताना पहाटेचा सुमारास मन्यार जातीच्या विषारी सापाने निकिता गणेश ठाकरे (वय ११ वर्ष) व सविता गणेश ठाकरे (वय १० वर्ष) या दोन्ही सख्या बहिणींना मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याची दुर्दैवी घटना घडली.
निकिता व सविता या दोघींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही चिमुकलींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.तेथे उपचार सुरू असतांना सविता गणेश ठाकरे आणि निकिता गणेश ठाकरे या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला.दोंडाईचा येथील आरडीएमपी हायस्कूल निकिता इयत्ता सातवीच्या वर्गात होते तर सविता हि पाचवीचे शिक्षण घेत होती. या घटनेमुळे वणीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.