चोरांचा धुमाकूळ,एकाच गावात रात्रीतून सहा ठिकाणी घरफोडी,

बातमी कट्टा:- एकाच रात्रीत चोरट्यांनी सहा घरफोड्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना आज दि 20 रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोरांनी गावातील डॉ अमोल बारीकराव मोरे,गणपत शंकर मोरे,प्रकाश भाऊसाहेब मोरे,सुधाकर निळकंठ मोरे,भटू सीताराम मोरे,मधुकर निळकंठ मोरे यांच्या बंद घरांना टार्गेट करत चोरीचा डाव साधला आहे.यावरून चोरट्यांनी पहिले गावात येऊन घरांची रेकी केल्याचा संशय आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्यासह पथक दाखल झाले असून चौकशी करण्यात येत आहे.दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरांनी घरातील रोकड सोनेचांदीचे दागिने लंपास केले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: