घरफोडीत दागिन्यांसह रोकड लंपास…

बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील शिंपी गल्लीत धाडसी घरफोडी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून अज्ञातांनी लाखों रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोकड मुद्देमाल लांबविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील पाटील वाडा चौकाजवळ शिंपी गल्लीत राहणारे धीरज सुभाष शेटे यांच्या बंद घरात रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याची घटना शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.यात चोरट्यांनी धीरज सुभाष शेटे यांच्या बंद घराचा लोखंडी दरवाजा आणि लाकडी दरवाजा उघडून घरात प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाटे खोलून समान अस्ताव्यस्त फेकून त्यातील लाखो रुपयांचे सोने चांदीचे आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने घरमालक धीरज शेटे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी शोध पथकाचे पोहेकॉ,लादूराम चौधरी,ललित पाटील,गोविंद कोळी,मुकेश पावरा, प्रवीण गोसावी,विनोद आखडमल आदींनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली.पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शोध पथकास मार्गदर्शन करून पुढील सूचना दिल्या. तसेच श्वान व फॉरेन्सिक पथकास माहिती देण्यात आली. पुढील कारवाई शहर पोलिसांकडून सुरू आहे.

WhatsApp
Follow by Email
error: