#shirpur |विना परवानगी बॅनर फलकांवर नगरपरिषदेची कारवाई

व्हिडीओ

बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरासह शहादा रोडवर नगरपालिकेने कारवाई करत विना परवानगी लावण्यात आलेले बॅनर (फलक) जप्त केले आहेत.यावेळी नगरपालिकेसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बॅनर काढायला ऐकाने विरोध केल्याने किरकोळ वाद निर्माण झाले होते.

On youtube

बॅनर लावल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने करवंद नाका परिसरातील व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला अडथळा निर्माण होणाऱ्या बॅनर(फलकांवर) कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन दिले होते.कुठलीही परवानगी नसतांना शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरासह शहादा रोडवर बॅनर(फलक) लावण्यात येत असल्याने आज दि 28 रोजी सकाळी 10:30 वाजेपासून शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक किरण बार्हे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक व पोलीस पथक करंवद नाका येथे दाखल झाले.व विनापरवाना लावण्यात आलेले बॅनर(फलक) ताब्यात करण्यात आले.याकारवाई मुळे एकच धावपळ उडाली होती.

On youtube
WhatsApp
Follow by Email
error: