काय गुरुजी तुम्ही पण ? ५ हजारांची लाच,मुख्याध्यापकसह शिक्षक ताब्यात

बातमी कट्टा:- मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून 5 हजारांची लाच स्विकारतांना साहाय्यक शिक्षकाला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मुख्याध्यापक आणि साहाय्यक शिक्षकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.10 हजार रुपये लाचेची मागणीकरून तडजोडीअंती ५ हजार रूपयांची लाच स्विकारल्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे.

तक्रादार हे एन बी.बागुल हायस्कूल सोनगीर येथे साहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असुन त्यांंना सदर शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी तक्रादार शिक्षक यांना कसुरी केल्याच्या कारणास्तव नोटीस दिली होती.त्याबाबत तक्रादार हे मुख्याध्यापक भानुदास माळी यांना भेटण्यास गेले असता त्यांनी सदर शाळेतील सहाय्यक शिक्षख हाफिज खान पठान यांना भेटण्यास सांगितले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी साहाय्यक शिक्षक हाफिज पठाण यांची भेट घेतली असता पठाण यांनी तक्रादार यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली.

यावरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तक्रादाराला मुख्याध्यापकाने साहाय्यक शिक्षक हाफिजखान पठाण यांच्याकडे तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच देण्यास सांगितले याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी कारवाईसाठी सापळा रचत सहाय्यक शिक्षक हाफीजखान पठाण यांनी तक्रारदार यांच्याकडून मुख्याध्यापक माळी यांच्या सांगणेवरुन मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर पोलीस स्टेशन समोर ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

सदरची कारवाई लाचलुचपत विभाग प्रतिबंधक धुळेचे उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण,प्रकाश झोडगे तसेच राजन कदम,शरद काटके, भुषण खलाणेकर ,संतोष पावरा,भुषण शेटे,संदीप कदम, रोहिणी पवार,रामदास बारेला ,गायत्री पाटील, वनश्री बोरसे, प्रशांत बागुल,प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: