बातमी कट्टा:- एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली असून याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.घटनास्थळी पोलीसांकडून तपासणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 29 रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर शहरातील चार ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.शहरातील किस्मत नगर, अरिहंत नगर आणि ओम नगर येथील दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.कुठे किती रक्कम चोरी झाली याबाबत अद्याप ठोस माहिती मिळु शकलेली नाही.सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांनाच बंद घरांना टार्गेट करत चोरांनी दिवाळी साजरी केली आहे.