बातमी कट्टा:-महावितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंताच्या सांगण्यावरून दहा हजारांची लाच स्विकारतांना वरिष्ठ वायरमन रंगेहाथ जाळ्यात अडकला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कनिष्ठ अभियंता आणि वायरमनला ताब्यात घेतले असून उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदार हे शिरपूर शहरातील वरवाडे परिसरातील रहिवासी त्यांचे मौजे खंबाळे ता.शिरपूर येथे सनी बियर अँण्ड शॉप आहे. सदर ठिकाणी वाणिज्य प्रयोजनासाठी विद्युत पुरवठा घ्यावयाचा असल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर केला होता.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कक्ष सुळे ता शिरपूर या कार्यालयात दि २/११//२०२२ रोजी प्रत्यक्ष जाऊन कनिष्ठ अभियंता समाधान सुधाकर पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत व त्या सोबत अवश्यक कागदपत्रे जोडून जमा केले होते त्यावेळी अभियंता समाधान पाटील यांनी तक्रारदार यांच्या कडे त्यांच्या विज कनेक्शन जोडण्याची डिमांड नोट काढणे संदर्भात त्यांचे अधिनस्त वरिष्ठ वायरमन निलेश माळी यांना भेटण्यास सांगितले होते.त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक निलेश माळी यांनी तक्रारदार यांच्या खंबाळे येथील सनी बियर अँण्ड वॉईन शॉप येथे जावून तक्रारदार यांच्या कडे डिमांड नोट काढून देण्यासाठी समाधान पाटील यांच्या सांगणेवरुन दहा हजार लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली.
तक्रारीवरून दि 3/11/2022 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान वरिष्ठ वायरमन निलेश माळी यांनी कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये पंचासमक्ष मागणी करुन लाचेची रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर स्वता स्विकारतांना
रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या विरुध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे पथकाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,मंजितसिंग चव्हाण, तसेच राजश कदम,शरद काटके,संतोष पावरा, गायत्री पाटील, संदिप कदम,रामदास बारेला,प्रशांत बागुल ,रोहिणी पवार,वनश्री बोरसे,प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींनी केली आहे.



