बातमी कट्टा:- शिरपूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.शहरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असतांना चोरांनी आता चोरीची हद्दच पार केली असून रात्रीच्या सुमारास चक्क 17 लाख किंमतीची स्कार्पीओ चारचाकी वाहनच चोरी झाल्याची घटना घडली आहे.
शिरपूरात चोरीचे सत्र सुरुच आहे.काही दिवसांपूर्वी शहरात घरफोडी झाल्याची घटना घडली होती त्यानंतर पोलीसांनी एक घरफोडी उघडकीस आणत चोरीचे भांडे ताब्यात घेतले होते.तसेच शहरातील सदगुरु हॉस्पिटल जवळून आतापर्यंत भरदिवसा तीन मोटरसायकली चोरी झाल्याची घटना घडली आहे.तर इदगा नगर येथून देखील दि 6 रोजी रात्रीच्या सुमारास घरासमोरील मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती.
मोटर सायकल चोरी घरफोडींची घटना ताजी असतांनाच आता चक्क शिरपूर शहरातील दादुसिंग कॉलनी येथून पुष्पराज कोमलसिंग पाटील यांच्या मालकीची एम एच 18 एजे 8878 क्रमांकाची स्कार्पीओ चारचाकी वाहन रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे.या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.चोरांनी चोरीची हद्द पार करत आता घरासमोरुन चक्क 17 लाख किंमतीची चारचाकी स्कार्पीओ वाहन चोरी केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.