Breaking news | धुळ्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

बातमी कट्टा:- धुळे येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि 15 रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास घेतल्याच उघड झाले असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांचा मृतदेह हिरे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: