बातमी कट्टा:- पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पथकाने शिरपूर शहरातील मेनरोडवरील बसस्थानक ते पाचकंदील पर्यंत रोजच होत असलेल्या वाहतूक कोंडीसाठी अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, भाजीपाला विक्रेते आणि रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करत संपूर्ण पाचकंदील ते बसस्थानक परिसर मोकळा केला आहे.यामुळे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.
शिरपूरात मेनरोडवरील बसस्थानक ते पाचकंदील परिसरात पोलीसांनी मोकळा केल्याने गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात मोकळा श्वास घेता येत आहे.पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पथकाने शिरपूर शहरातील मेनरोडवरील वाहतूक कोंडीसाठी अडथळा ठरणारे हातगाड्या,भाजीपाला विक्रेते आणि रस्त्यावर येऊन वाहत कोंडी निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करत संपूर्ण बसस्थानक ते पाचकंदील परिसरातील मेनरोड मोकळा केला आहे.या मेनरोडवर बेशिस्त वाहन वाहतूक करणारे, रस्त्याच्या मध्यभागी येऊन भाजीपाला विक्री करणारे किंवा वाहतूक कोंडी करणाऱ्यांमुळे येथे येणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याच परिसरातून शाळेत जाणारे विद्यार्थी विध्यार्थीनी असतील महिला तरुणीनी नागरिक आदींना पाचकंदील ते बसस्थानक पर्यंत चालतांंना तारेवरची कसरत करावी लागत होती.
हे दुकानदार किंवा व्यापारींना देखील मोठा फटका बसत होता.मात्र पोलीसांनी दोन दिवसांपासून सुरु केलेल्या कारवाई मुळे मेनरोडने मोकळा श्शास घेतला आहे.पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्यासह संपूर्ण पथक पाचकंदील ते बसस्थानक पर्यंत पायी चालत कारवाई करत असल्याने संपूर्ण मेनरोड मोकळा झाला आहे.पोलीस निरीक्षकांनी सुरु केलेल्या या कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्यासह शिरपूर शहर पोलीसांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.