बातमी कट्टा:- पोलीसांनी रात्रीच्या सुमारास पाठलाग करुन ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये बनावट देशी दारुचे बॉक्स आढळून आले होते.चालक पळून जात असतांना त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने बानवट देशी दारुचा कारखानाबाबत माहिती दिली पोलीसांनी रात्रीच घटनास्थळी छापा टाकला आणि सुमारे 95 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.सदरची कारवाई धुळे तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
बनावट मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी कारवाई करण्यासाठी रात्री 10 वाजेच्या सुमारास वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक सुसाट निघाले व थोड्या अंतरावर जाऊन तो ट्रक सोडून चालक व क्लिनर पळून जाण्याच्या मार्गावर असतांना ट्रक चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले.त्याने त्याचे नाव सोपान रविंद्र परदेशी वय २९ असे सांगितले त्याची चौकशी केली असता सदर मुद्देमाल हा दिनेश निंबा गायकवाड रि.शिरूड व राहुल अहिरराव ऊर्फ राहूल मास्तर रा.साक्री यांचा असून कुसुंबाच्या पुढे असलेल्या जंगलात मद्यनिर्मीतीचा अड्डा टाकलेला असल्याचे त्याने पोलीसांनी मुद्देमालासह २३ लाख ५० हजारांचा ट्रक ताब्यात घेतला.व रात्रीच दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्याचा निर्णय घेतला.पोलीसांनी कारखानाचे लोकेशन घेऊन रात्रीच्या सुमारास धाड टाकली.तेव्हा पोलीसांच्या हाती मोठे घबाड लागले.प्रवरा डिस्टीलरीचे नाव वापरून रॉकेट देशी दारू संत्रा बनविली जात होती.
यावेळी हायटेक मशिनरींचा वापर सुरु होता.यावेळी पोलीसांनी २५ लाख रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्यांना सिल व स्टिकर लावण्याचे मशीन,६ लाख किंमतीचे प्युरीफायर,१६ लाख ५० हजारांचे स्पिरीट ,१ लाख किंमतीचे बूच,४ लाख ९० हजार किनमतीच्या रिकाम्या बाटल्या,१ लाख २९ हजारांची बॉक्स भरलेली दारु,१४ हजार ८०० रुपयांची टाकीत भरलेली दारू,२ लाख किंमतीचे जनरेटर,विना नंबरची स्कार्पीओ,दोन मोटरसायकल यांच्यासह बॉक्स चिटखवण्याचे टेपचे बॉक्स,२० हजार किंमतीचे २० ड्रम,टाक्या,इलेक्ट्रीक मोटार तसेच ३० हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक वाटर असा एकुण ९५ लाख ७७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनू डॉन,राहूल अहिरराव ऊर्फ राहूल मास्तर, गुलाब शिंदे,सोपान रवींद्र परदेशी, शांतीलाल मराठे, सागर भोई,सुनील सुधाकर देवेरे,ज्ञानेश्वर राजपूत, सचिन सुधाकर देवरे,नितीन लोहार आदींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.