बातमी कट्टा : श्री क्षेत्र नागेश्वर येथे दत्त जयंती निमित्त ७ डिसेंबर २०२२ रोजी दत्तयाग व त्रिशुलारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र नागेश्वर, श्रीदत्त जन्मोत्सव मार्गशीर्ष शुध्द पौर्णिमा बुधवार दि. ७/१२/२२ रोजी सकाळी ७ ते १२ पर्यंत साजरा होत आहे. याच जन्मोत्सवाचे औचित्य साधून दत्तयाग व त्रिशुलारोपण विधी संपन्न होत आहे.
यावेळी श्रीदत्त जन्मोत्सव महाआरती भूपेशभाई रसिकलाल पटेल व सौ. कृतीबेन भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच त्रिशुलारोपण विधी कुसुंबा ता.जि. धुळे येथील विलास लक्ष्मण सोनवणे व सौ. रोहीणी विलास सोनवणे यांच्या हस्ते होईल. दत्तयाग सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत, त्रिशूलारोपण विधी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत, उत्तरांग पूर्णाहुति दुपारी ११ ते १२ या वेळेत तर जन्मोत्सव आरती व महाप्रसाद (भंडारा) दुपारी १२ वाजता होईल. वारकरी संगीत भजनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे
नागेश्वर मंदीर परिसरातील श्रीगुरूंचे मंदीरात सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीदत्त जन्मोत्सव मार्गशीर्ष शुध्द पौर्णिमा म्हणजेच बुधवार दि. ७/१२/२२ रोजी साजरा होत आहे. नागेश्वर मंदीर परिसरात ६१ फुटी त्रिशूलारोपण, दत्तयाग व त्रिशूलारोपण विधी वैदीक ब्राम्हणांचे मंत्र गजरात सकाळी ८ ते १२ या वेळेत करण्यात येईल.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल व समस्त ट्रस्टी यांनी केले आहे.