बातमी कट्टा:- नाशिक पदवीधर मतदार निवडणूकीचे उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिल्यानंतर शुभांगी पाटील यांनी धुळे येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची भेट घेतली.यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी चर्चा केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर काल दि १८ रोजी सायंकाळी धुळे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची शुभांगी पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भावनिक आवाहन करत सहकार्याची विनंती करण्यात आली तसेच विजय आपलाच होणार,असा विश्वास पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभांगी पाटील यांना दिला, राज्यातील टीडीएस संघटना, टीचर असोशियन व इतर सर्व संघटना मला साथ देतील असा विश्वास शुभांगी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांना मी नक्कीच पूर्ण करेल अशी आशाही शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली.