बातमी कट्टा:-रात्री खेळत असतांना विजेच्या पोलला स्पर्श झाल्याने एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळे शहरातील गफूर नगर भागात घडली आहे.अर्शद अहमद अशपाक मोमीन अस मृत मुलाचे नाव आहे.
काल दि १८ रोजी धुळे शहरातील गफूनगरात अर्शद हा मित्रांसोबत खेळत होता. या दरम्यान अर्शद याचा घराजवळ असलेल्या विद्युत पोलला स्पर्श झाला.आणि काही क्षणातच अर्शदचा जागीच मृत्यू झाला.
हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.येथ तांत्रिक समस्या असल्याची तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने अर्शद मोमीन याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.अर्षदच्या मृत्यूला कारणीभूत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात अली आहे.