बातमी कट्टा:- डोळ्यादेखत संपूर्ण घर जळून खाक झाल्याचे बघून शेतकरी कुटूंबाने एकच आक्रोश व्यक्त केला.अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जेमतेम उदरनिर्वाह करुन पोट भरणाऱ्या शेतकरी शेतात असलेल्या घराला अचानक आग लागली आणि आणि या आगीत घर खाक झाले.या आगीत घरातील धान्य,संसारोपयोगी साहित्य, कागदपत्रे व घरात साठवून ठेवला २० ते २५ क्विंटल कापूस हे संपूर्ण जळून खाक झाले.या घटनेमुळे शेतकरी संकटात सापडले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील गृप ग्रामपंचायत सांगवी अंतर्गत येणाऱ्या धारबर्डी येथील शिलदार गुलाब पावरा यांच्या शेतातील घराला मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागून घरातील कापूस, कपडे, धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत.
सदर झालेल्या घटनेत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दोन ते तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.वाऱ्याचा वेग जोराचा असल्याने आगीने पेट घेतला.
यादरम्यान घराला आग लागून २० ते २५ क्विंटल कापूस, कपडे, धान्य, शेती औजारे व नगदी रोकडसह इतर महत्वाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत. ही आग कशामुळे लागली हे कळूच शकले नाही. तथापी दुष्काळी परिस्थिती असून त्यातच ही घटना घडल्यामुळे पावरा कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. शिलदार पावरा यांचा मुलगा राष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून खेळला आहे.सदर कुटुंबाला संबंधित भागातील अधिकारी झालेल्या नुकसानीची पंचनामा करून भरपाई मिळवून देतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.