शिरपूरात “एनडीआरएफ” पथक दाखल,”त्या” घटनेकडे सर्वांचे लक्ष !!

बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदीपुलावरुन अपघातानंतर पाण्यात कोसळलेल्या ट्रकचा शोध लागत नसल्याने प्रशासनाने एचडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना केले होते.मात्र एचडीआरएफ पथकाच्या दिवसभरच्या मेहनीनंतर देखील अपयश आल्याने प्रशासनाने अखेर आता एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी रवाना केली आहे.

दि २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ०९ एफ ए ६४८७ क्रमांकाची क्रुझर वैजापूर येथून मजूर घेऊन जात असतांना अचानक टायर फुटल्याने क्रुझर पुलावर पलटली होती मात्र क्रुझर मागून येणाऱ्या ट्रकचा तोल जाऊन ट्रक थेट तापी पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळले होते.यात क्रुझर मध्ये १५ मजूर प्रवासी होते.त्यात तीन ते चार जण जखमी झाले होते.मात्र रात्री तापी पुलाचे कठडे तोडून तापीनदीत कोसळलेले वाहन नेमके कोणते याचा शोध त्या दिवशी रात्री लागला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्या वाहनातील कागपत्रांची फाईल पाण्यात तरंगत असल्याचे पोलीसांना प्राप्त झाल्यानंतर ट्रकची ओळख पटली होती.घटनास्थळी शिरपूर शहर व नरडाणा पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले होते.दुसऱ्या दिवशी टोलनाकाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु होते.सावळदे येथील स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य करण्यात आले मात्र त्यांच्याकडून शक्य झाले नाही.घटनेच्या ४८ तासानंतर प्रशासनाने एचडीआरएफ पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले होते.मात्र एचडीआरएफच्या पथकाकडून देखील शक्य झाले नव्हते.आता घटनेच्या चार दिवसानंतर एनडीआरएफची तुकडी शिरपूर येथे रवाना झाली आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून या तापी नदीत बुडालेल्या ट्रकचा व चालकाचा शोध घेण्यात येणार आहे. रात्री एनडीआरएफचे जवान शिरपूरात दाखल झाले असून दि २७ रोजी सकाळी तापीनदीपात्रात त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: