एनडीआरएफ पथकासोबत अमोल राजपूत तापी नदीपात्रातून थेट लाईव्ह…

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- सकाळी आठ वाजेपासून एनडीआरएफ पथक तापी नदीपात्रात शोध कार्यासाठी दाखल झाले असून त्यांच्या सोबत “बातमी कट्टा”चे प्रतिनिधी अमोल राजपूत हे देखील रेस्क्यू बोटमध्ये बसून घटनास्थळी वृत्तांकनासाठी दाखल झाले होते.

On youtube

दि २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ०९ एफ ए ६४८७ क्रमांकाची क्रुझर वैजापूर येथून मजूर घेऊन जात असतांना अचानक टायर फुटल्याने क्रुझर पुलावर पलटली झाली होती मात्र क्रुझर मागून येणाऱ्या ट्रकचा तोल जाऊन ट्रक थेट तापी पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळली होती.

Video

घटनेच्या चार दिवसानंतर एनडीआरएफची तुकडी शिरपूर येथे रात्री दाखल झाली होती आज सकाळी आठ वाजे पासूनच एनडीआरएफच्या पथकाकडून या तापी नदीत बुडालेल्या वाहनाचा व त्यातील चालकाचा शोध सुरु करण्यात आला.यात दोन बोटींमध्ये एकुण दहा कर्मचारी दाखल झाले आहेत. यात दोन जण (डीप ड्रायव्हर)डिप डाईव्हींग (ऑक्सिजन सिलेंडर) सेट घेऊन थेट चाळीस ते पन्नास फुट खाली पाण्यात जाऊन प्रत्यक्षदर्शी वाहनाचा शोध घेत असून सुमारे पाच ते सहा तास शोध घेऊन देखील दुपारी २ वाजेपर्यंत वाहनाचा योग्य पध्दतीने शोध लागू शकलेला नाही. जवळपास पाच ते सहा तासांत दोन ते तीन वेळा पाण्याच्या आत शिरून शोध घेण्यात आला मात्र अद्यापपावेतो एनडीआरएफ पथकाच्या हाती काही एक लागलेले नाही.घटनास्थळी एनडीआरएफ चे अधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार,पोलीस निरीक्षक सह शिरपूर पोलीस उपस्थित आहेत.

या बातमीच्या प्रत्येक अपडेटसाठी बघत रहा “बातमी कट्टा” न्युज पोर्टलवर….

WhatsApp
Follow by Email
error: