सुदर्शन लॉजमध्ये बिनलाजेचे दर्शन ! झालं काय अन् लिव्हल काय ?

बातमी कट्टा:- शिरपूर शहर पोलीसांनी अचानक लॉज वर धाड टाकल्याची घटना घडली असून या घटनेमुळे एकच धावपळ उडाली आहे.या कारवाईत काही लॉजवरून तरुण तरुणींना ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करत समज देऊन सोडण्यात आले मात्र या संपूर्ण घटनेत पोलीसांच्या कामगिरी वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथून पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांनी अचानक पोलीस पथकांना सोबत घेत शहरातील सुदर्शन लॉजवर सकाळी १२ वाजेच्या सुमारास धाड टाकली यावेळी लॉजमधून सहा तरुण व सहा तरुणींना ताब्यात घेतले.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली कारवाई नंतर पोलीस शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल होत नाही तोवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनात प्रचंड गर्दी जमली होती.

विशेष म्हणजे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या या आंबटशौकीण तरुण तरुणींमध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी असल्याचे निष्पन्न झाले आहे.ताब्यात घेतलेल्या या तरुण तरुणींना त्यांच्या नातेवाईकांना बोलवून समज देऊन सोडण्यात आले तर सुदर्शन लॉज चा मालक दर्शन दशरत पाटील वय २३ याच्या विरुध्द साधी तक्रार नोंदवून कारवाई करण्यात आली.

तरुण तरुणींना समज देऊन सोडले याला काही कोणाची हरकत नाही मात्र जेथे लॉजच्या नावाने भरदिवसा असे धंदे सुरु असतील आणि त्यावर कुठलीच ठोस कारवाई न करता साधी तक्रार नोंदवली जात असणार तर अशा धंद्यांना नेमक कोण प्रोत्साहन देत आहे याबाबत प्रश्न निर्माण होतो.

शिरपूरात असे धंदे सुरु असतील तर याबाबत शिरपूरकर ,सामाजिक संघटनांनी पुढे येऊन अशा घटनांचा विरोध करणे अवश्यक आहे. ऐवढी मोठी घटना होऊन देखील जर अशांवर ठोस कारवाई होत नसणार तर असे धंदे भविष्यात कधीच थांबणार नाहीत हे तेवढेच खरं आहे. कायद्याचे रक्षकांकडून जर अशा पध्दतीने कारवाई होत असेल तर ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

WhatsApp
Follow by Email
error: