बातमी कट्टा:- बनावट पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला शिरपूर शहर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. त्याच्या ताब्यातून बनावट पिस्तूल, एक जिवंत काडतूस व मोटरसायकल ,मोबाईल जप्त करण्यात आली आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना गोपणीय माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे शिरपूर पोलीस स्टेशनचे शोध पथकाने शिरपूर शहरातील कुंभारटेक येथील ग्रीन टि हाऊस। चहा दुकानाजवळ सापळा रचला.यावेळी एक ईसम संशयित रित्या मिळून आल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या कडे एक गावठी बनावटीची पिस्तूल,जिवंत काडतूसे, मोबाईल आणि मोटरसायकल मिळून आली.त्याने स्वताचे नाव साबीर शेख रा.कुंभार टेक असे सांगितले.त्याच्या विरूद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे किरण बार्हे, ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद अखडमल,प्रविण गोसावी, मुकेश पावरा,प्रशांत पवार, स्वप्नील बांगर,अमित रणमाळे उमाकांत वाघ,भटु साळुंखे आदींनी केली आहे.