वावर आहे तर पावर आहे !!उच्चशिक्षित शेतकऱ्याची केळी “ईराण”ला रवाना…

व्हिडीओ

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हिंगोणी येथे उच्चशिक्षित तरुण शेतकरी प्रमोद पाटील यांनी आपल्या ३ एकर क्षेत्रात सुमारे ४ हजार १०० केळी झाडांची लागवड करुन आर्थिक प्रगती साधली आहे.लागवडीच्या दहा महिन्यानंतर त्यांच्या शेतातील केळी आता विदेशात ईराण येथे जात आहे. त्यांना या केळीला ३२०० पेक्षा जास्त दर मिळाला असून असाच भाव राहिला तर तीन एकरातील या केळीच्या उत्पादनातून त्यांंना अंदाजे १८ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

बघा व्हिडीओ

प्रमोद रतीलाल पाटील वय ३२ यांना लहनापनापासूनच शेतीची आवड आहे.त्यांचे शिक्षण एम.ए.एम एड झाले आहे. मात्र शेतीत आवड असल्याने प्रमोद पाटील यांनी शेतीतच आपले लक्ष केंद्रीत केले आहे.गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रमोद पाटील हे आपल्या शेतात केळी या फळपिकाची लागवड करतात.

१३ मे २०२२ रोजी त्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात केळी पिकाचे ४१०० रोपांची लागवड केली.केळी लागवडीनंतर केळी पिकातील तज्ञ व अभ्यासकांचा त्यांनी वेळोवेळी सल्ला घेतला. शेतातील केळीचे उत्पादन हे एक्सपोर्ट व्हावे अशी ईच्छा त्यांची होती.त्यापध्दतीने त्यांनी केळी पिकाला वेळोवेळी लागणारे फवारणी, औषध व उपाययोजना केल्या आहेत.

हिवाळ्यात जास्त थंडीमुळे केळी पिंकाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक झाडावरील केळी त्यांनी स्कटींग बॅग मध्ये झाकलेले होते.यामुळे केळीची शाईनींग देखील राहण्यास मदत होते.

क्रेसीटा ऍग्रो फार्म सप्लाय प्रायवेट.लीमीटेड.व रमजा एक्सझिम यांच्या मार्फत राधे व सामी या ब्रँड खाली प्रमोद पाटील यांची आज दि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या केळीची कटींग होत असून संपूर्ण केळीची बॉक्स मध्ये पॅकिंग होऊन ती ईराण राज्यात पाठविली जात आहे.इराण,ओमान,दुबई व युरोप आणि इतर आखाती देशांमध्ये जास्ततर केळीची निर्यात केली जाते.क्रेसीटा या निर्यात कंपनीचे सचिव बलरामसिंह सोलंकी ,संचालक निलेशसिंह राजपूत तसेच पूजा सोलंकी यांनी दिलेल्या माहिती नुसार निर्यातक्षण केळीची तीची पॅकिंग हे सर्व आंतरराष्ट्रीय निर्यात नियमानुसार केली जाते.

यावर्षी केळी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. करपासह ईतर रोगराईमूळे अनेकांना पिकांमध्ये नुकसान सहन करावे लागले आहेत. उत्पादन अमी असल्याने क्वॉलिटी असलेल्या केळी पिंकाना चांगला दर मिळत आहे.या तीन एकर क्षेत्रात प्रमोद पाटील यांना कमीत कमी ६० टन उत्पन्न येणे अपेक्षित आहे.यावेळी त्यांंना ३२०० दर मिळाल्याने शेतकरी प्रमोद पाटील यांनी समाधान व्यक्त केला आहे.

रोगराई येण्याआधीच त्याच्यावर उपाययोजना करणे गरजेचे असून आपण शेतात लागवड करत असलेल्या पिकांची योग्य पध्दतीने अभ्यास करावा,त्या पिकांच्या अभ्यासकांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा जेणे करुन आपल्या उत्पादनात वाढ होईल असे आवाहन उच्चशिक्षित तरुण शेतकरी प्रमोद पाटील यांनी केले आहे.

On YouTube
WhatsApp
Follow by Email
error: