सावळदे येथील पुरातन महादेव मंदिर परिसरात यात्राेउत्सव!

बातमी कट्टा: सावळदे ता. शिरपुर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने तापी काठावरील पुरातन महादेव मंदिर येथे गावकऱ्यांच्यावतीने यात्राेउत्सव आयोजित केला आहे.

दि. १८ फ्रेबुवारी राेजी शिवरात्रीच्या निमित्ताने सकाळी ८: ०० वाजता महादेव मंदिर येथे शिव अभिषेक व शिवलिंगाचे विधिवत पुजन करण्यात येणार आहे. तर भाविकांना फराळ वाटप करण्यात येईल. सांयकाळी ६ ते ८ ह. भ. प. श्रध्दाताई टेकवाडेकर यांचे जाहीर किर्तनाचा तर रात्री अखंड हरीनाम भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. १९ राेजी सकाळी ११ वाजेपासून तर आगमनापर्यंत भाविक भक्तांना महाप्रसाद भंडाऱ्याचे आयाेजन केले आहे. तर १९ राेजी रात्री सुकलाल बाेराडीकर यांच्या लाेकनाट्य तमाश्याचे आयाेजन केले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी माेठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावळदे येथील गावकरी यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: