बातमी कट्टा:- एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरु असतांना अचानक तेथे आलेल्या तरुणाला बघुन शुट कर दुंगा किसी को नही बताना अशी धमकी देत चार चोरटे घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना घडली असून पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि १९ रोजी मध्यरात्री शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे शिंदखेडा रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या एटीएम मशीनवर प्रणव किशोर जाधव वय २३ हा आला असता तेथे चार ईसम एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करतांना प्रणव जाधव याला दिसून आले.त्यावेळेत चार संशयिता पैकी एकाने प्रणव जाधव याला शुट कर दुंगा किसी को नही बताना असे हिंदी भाषेत धमकी देऊन चारही संशयित पांढऱ्या रंगाची ब्रिझा कंपनीच्या चार चाकी वाहनातून निघून गेले.याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शिरपूर पोलीस पथक दाखल झाले होते.घटनास्थळी संशयितांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.


