बातमी कट्टा:-जंगल परिसरात पुरुष जातीचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.मात्र मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री तालुक्यातील चिवटिबारीच्या जंगलातील झाडाझुडुपांमध्ये शुक्रवारी सकाळी अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.याबाबत पिंपळनेर पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.झाडाझुडुपांमध्ये उताणे अवस्थेत मृतदेह फेकलेला कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली असून प्रथमदर्शनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.