बातमी कट्टा:- लग्नसमारंभासाठी आलेल्या आठ वर्षीय बालकाचा ट्रक ने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १८ रोजी दूपारी अडीच वाजेच्या सूमारास घटना घडली.मनोहर कैलास पाटील असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
उधना सुरत येथील रेखाबाई कैलास पाटील त्यांचा मुलगा मनोहर कैलास पाटील व भाऊ संदिप गोरख पाटील यांच्यासोबत उधना येथून शिंदखेडा येथे लग्नसमारंभासाठी आले होते. विवाह संभारंभ आटोपून जेवण झाल्यावर मामा संदिप पाटील व बालक मनोहर पाटील हे काकाजी मंगल कार्यालयाबाहेर झाडाखाली उभे होते.त्यानंतर कार्यालयासमोर असलेल्या रसंवंतीवर बालक मनोहर कैलास पाटील त्याच्या मामा संदिप गोरख पाटील हे
उसाचा रस पिण्यासाठी गेले.तेथे रस पिऊन परत येत असतांना रस्ता ओलांडताना शिंदखेडा कडुन दोंडाईचा कडे भरधाव जाणार्या एम.एच 04 पी 8782 क्रमांकाच्या ट्रकने मनोहर पाटील या बालकाला धडक दिली.यात मनोहर जबर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्यास शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.कुंदन वाघ यांनी मयत घोषीत केले.
व्हिडीओ साठी लिंक क्लिक करा https://youtu.be/J8rX7Bvwy8M
सदर घटनेची फिर्याद मामा संदिप गोरख पाटील रा.लोंढवे ता.अमळनेर हल्ली मुक्काम.शिवदर्शन सोसायटी उधना सुरत यांनी दिली असुन शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे. सदर ट्रक चालकास ताब्यात घेतले असुन सदर घटनेचा पो.हे.कॉ.ए.बी पवार हे तपास करीत आहे. सदर बालक मनोहर पाटील हा एकुलता एक मुलगा होता.सदर घटना घडताच बालकाच्या आईने एकच हंबरडा फोडला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.