बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तापी नदीपात्रात एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून तापी पुलावर मोटरसायकल कपडे व पाकीट आणि चप्पल मिळुन आले आहेत. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असून शोधकार्य सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील सावळदे तापी आज दि 8 रोजी सकाळच्या सुमारास एक मोटरसायकल बेवारस पध्दतीने दिसून आली आहे. पुलावर मोटरसायकल सोबत टिशर्ट, पाकीट आणि चपला आढळून आल्या असून ये जा करणाऱ्या प्रवासींनी घटनेबाबत शिरपूर शहर पोलीसांना माहिती दिली आहे. पाकीट मध्ये आधारकार्ड मिळुन आल्याने नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. घटनास्थळी शोध कार्य सुरु असून अद्याप पावेतो कोणतीही माहिती मिळु शकलेली नाही.



