बातमी कट्टा:- मनमाड इंदौर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित बोरविहीर धुळे ते नरडाणा या नवीन रेल्वे मार्गासाठी धुळे तालुक्यातील गावासाठी भूसंपादन कार्यवाही करणेकामी सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ,धुळे यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धुळे कार्यालयामार्फत प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग बोरविहीर (धुळे) ते नरडाणा या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादित करण्याची कार्यवाही सुरु आहे. धुळे तालुक्यातील २० गावांमधून नवीन रेल्वे मार्ग जात असून त्यासाठी भूसंपादनाचे एकीण २२ प्रस्ताव कार्यान्वित आहे.
धुळे तालुक्यातील प्रस्तावित रेल्वे मार्गावरील सर्व गावांचे संबधीत प्रशासकीय विभागांना सोबत घेऊन संयुक्त मोजणीचे व इतर तत्सम कामकाज पूर्ण झालजले आहे. सद्यस्थितीत २० गावांपैकी दापुरा,सरवड,लोणकुटे,कुंडाणे (वरखेडे),निमखेडी व धमाणे या ७ गावांची जमीन संपादनाची उदघोषणा रेल्वे (सुधारणा)अधिनियम २००८ अन्वये अधिसूचना २०(ई) भारत राजपत्रात व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर भूसंपादनाचे काम अचूक व पारदर्शी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून निवाडे पारित करतांना उपग्रह छायाचित्रे, ड्रोनद्वारे घेतलेली छायाचित्रे तसेच रोव्हर मशीनद्वारे निश्चित करण्यात आलेल्या स्थळनिर्देशांकांचा वापर करण्यात आला आहे. अंतिम निवाडे पारित करण्याचे कामकाज सुरु झाल्याची माहिती धुळे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे,(भाप्रसे) यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे.