राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने राजकपूर मराठे सन्मानित

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील उपसरपंच माजी कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूरचे संचालक तसेच विविध कार्यकारी सोसायटी संचालक राजकपूर किसनराव मराठे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघातर्फे भास्करराव पेरे पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सरपंच सेवा संघाचे संस्थापक सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे उपस्थित होते. प्रमुख अतिथी आदर्श सरपंच तथा जिल्हाध्यक्ष संजय काळे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे,मानव अधिकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गिरी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार सोहळयासाठी सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सहसंचालक रोहित पवार, कार्यकारी संपादक निलेश कुमार पावसे, राज्य संघटक रवींद्र पवार, राज्य संपर्कप्रमक अमोल शेवाळे, राज्य समन्वयक देविदास फापाळे आदींनी परिश्रम घेतले. राजकपूर मराठे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघातर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल,आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच उंटावद ग्रामस्थ व शिरपूर तालुक्यातून अनेक मान्यवरांनी कौतुक केले.

सरपंच नेहमी गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा असावा. व्यक्तिगत हिताच्या पलिकडे कार्य करणारा, निस्पृह, प्रामाणिक पणे काम करणारा असावा. आणि अशा तळमळीने, पोटतिडकीने स्वतःच्या आयुष्याचा सारा वेळ आपल्या गावाच्या विकासासाठी देणारा सरपंच असावा. अशा सरपंचाचीच निवड सरपंच सेवा संघातर्फे होत असते. आणि त्याचा सन्मान या कार्यक्रमातून केला जाणार असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.

उंटावद ता. शिरपूर येथील सरपंच राजकपूर मराठे यांनी जेव्हापासून सरपंच पदाची धुरा सांभाळली तेव्हापासून त्यांनी एकच ध्यास गावाचा विकास हे आपल्या जीवनाचे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास साधला. आपल्या स्वभाव कर्तृत्वाने व गतिशील, संघटीत नेतृत्वाने गावातील लोकांना संघटीत करून आपल्या गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. गावात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करून तळागाळापर्यंत त्याचा लाभ पोहोचविला गावातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण, मिनरल वॉटर योजना, गावठाण विकास, घरकूल योजना, ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण, सुशोभीकरण, ग्रामपंचायत तर्फे गावातील तरूणांचे आरोग्य सुदृढ राहावे व देशाला सुदृढ व सशक्त नागरिक मिळावे यासाठी व्यायाम शाळा, गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी हजारो लिटर पाणी क्षमतेची पाण्याच्या टाकीसाठी शासकीय अनुदान मंजूर करून घेणे, शाळेच्या विकासासाठी खोल्यांचे बांधकाम व दुरूस्ती, कंपाऊंड, क्रीडाक्षेत्रातील विकासासाठी गावात क्रीडा संघटना स्थापन करणे, खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देणे, गावातील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमासाठी नेहमी तत्परता ठेवणे आदी कितीतरी कार्य त्यांनी गावाच्या विकासासाठी केले. त्यांचे सामाजिक काम पाहूनच आमदार अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संचालक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाने घेतली व महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कारासाठी त्यांचे नाव घोषित केले. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, तरूण मित्र मंडळ यांची मदत घेऊन व आदरणीय आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून गावाचा विकास ते साधण्याचा प्रयत्न करित आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: