बातमी कट्टा:- काम आटोपून मोटरसायकलीने घरी जाणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचा भिषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची नोंद पोलीस स्टेशनात करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार कृष्णा भीका भिल वय २६ रा.दोंडाईचा हा शिंदखेडा येथील खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत होता.मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास कृष्णा हा एम एच १८ बीपी 4661 क्रमांकाच्या मोटरसायकलीने शिंदखेडा येथे येण्यासाठी निघाला होता.मात्र बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत तो घरी आला नसल्याने आईने कृष्णा च्या मोबाईल वर संपर्क केला असता फोन उचलला नाही. त्यानंतर शिंदखेडा पोलिसात तक्रार केली.
कृष्णा भिल हा मोटरसायकलीने शिंदखेडा येथून दोंडाईचा कडे जात असतांना शिंदखेडा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील फरशी पुलाजवळ दोंडाईचा कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली.याबाबत अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.