बातमी कट्टा:- आयशर वहानातून मोबाईल टॉवरसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या आडोश्याला प्रतिबंधीत असलेली सुंगधी तंबाखू मध्यप्रदेश राज्यातून शिरपूरच्या दिशेने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने कारवाई करत तंबाखूसह सुमारे ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना गोपणीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे शोध पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले होते.शिरपूर पोलीस स्टेशनचे शोध पथक तालुक्यातील कळमसरे शिवारातील चोपडा फाटा येथे पंचासह सापळा रचला असता १५:३० वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वर इंदौर कडुन शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या एच.आर.४६/ई.१९६९ क्रमांकाच्या आयशरला पथकाने थांबवले.आयशरच्या मागच्या बाजुस तपासणी केली असता मोबाईल टॉवर साठी लागणाऱ्या साहित्याच्या आड्योश्याला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत तंबाखूचे खोके आढळून आले.
पोलीसांनी आयशर व तंबाखू असा एकुण ४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत आयशर चालक अशोक आजादसिंह बडख वय ३४ रा.बाळंद ता.जि.रोहतक ,राज्य हरियाणा यास अटक करण्यात आली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोवीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर,पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे,संदिप मुरकुटे,तसेच डि.बी.पथकाचे ललीत पाटील, लादुराम चौधरी,मनोज पाटील, विनोद अखडमल,योगेश दाभाडे,मुकेश पावरा,प्रशांत पवार,मनोज दाभाडे,प्रविण गोसावी, सचिन वाघ,भटु साळुंखे तसेच होमगार्ड मिथुन पवार,राम भिल,चेतन भावसार,व शरद पारधी आदींनी कारवाई केली आहे.