बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडाटासह पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक पाऊस झाला तर काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे दृश्य बघावयास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज पहाटेच्या सुमारास धुळे जिल्ह्यात अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.काही भागात तुरळक पाऊस झाला तर काही भागात प्रचंड गारपीट झाली तर काही भागात वादळी वाऱ्याने झाडे रस्त्यावर कोसळली आहेत.शिरपूर तालुक्यातीला सुरुवात गारपीटीनंतर पाऊस सुरु झाला मात्र काही मिनीटात मात्र पाऊस थांबला तर शिंदखेडा तालुक्यातील शोनशेलु भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.व शेवाळे भागात वादळी वाऱ्याने झाडे कोलमडून पडले आहेत.मध्यरात्री आलेल्या वादळी वारासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.