बातमी कट्टा:- दोंडाईचा ता. शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागांसाठी आज दि 29 रोजी सकाळी नऊ वाजेपासून शिंदखेडा येथील काकाजी मंगलकार्यालय येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 16 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत.
काल दि 28 रोजी एकुण तीन हजार ६० पैकी दोन हजार ९५१ मतदारांनी हक्क बजावत ९६.४४ टक्के मतदान झाले आहे.आठ टेबलांवर मतमोजणी होणार असून सुरुवातीला एक ते चार क्रमांकाच्या टेबलवर सेवा सहकारी मतदारसंघाची व पाच ते सात क्रमांक टेबलवर ग्रामपंचायत मतदारसंघ व आठ क्रमांक टेबलवर हमाल व तोलारी मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे शिंदखेडा पोलीस प्रशासनासह दोंडाईचा पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.