बातमी कट्टा:-हॉटेलात स्वयंपाकी काम करणाऱ्या आचारीचा मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून याबाबत चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे नंदुरबार रोडवरील पुष्पा हॉटेलात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या मध्यरात्री राज्यातील नरेश लालचंद साहू या 54 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज दि 8 रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोंडाईचा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन दाखल झाले असून अधिक चौकशी सुरु आहे.खून कोणी व का केला याबाबत पोलीसांकडून तपास सुरु असून खूनासाठी दोन हत्यारांनी घाव घातल्याचे प्रथमदर्शनी पोलीसांना दिसून आले आहे.