बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावरील एका रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा टिशर्ट आणि अंडरपॅन्ट घातलेला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून प्रथमदर्शनी खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुका हद्दीत आज दि 8 रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गा पासून हाकेच्या अंतरावर लालमाती येथे एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले होते.प्रथमदर्शनी गळा आवळलेला व मांडी जवळ भाजलेल्या स्थित मृतदेह आढळून आल्याने खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर कुठल्याच प्रकारची ओळख मिळु शकत नसल्याने पोलीसांकडून अनोळखी मृतदेहातील व्यक्ती कोण ? याचा खून कोणी व का केला याबाबत चौकशी सुरु आहे.मृतदेहाच्या अंगावर टिशर्ट आणि अंडपॅन्ट असून झाडाझुडुपांमध्ये मृतदेह फेकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.मृतदेहाच्या एका मांडीवर भाजल्याचे दिसून आले आहे.