मृतदेहाची ओळख पटवून दिल्यास व त्याचे मारेकरीचे नाव पत्ता बाबत माहिती दिल्यास शिरपूर पोलीसांकडून “25” हजारांचे बक्षीस

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावरील एका रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा टिशर्ट आणि अंडरपॅन्ट घातलेला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना काल दि 8 रोजी सकाळी घडली होती.मात्र मयत ईसमाची ओळख पटत नसल्याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने मृतदेहाची ओळख पटवून दिल्यास व त्याचे मारेकरीचे नाव पत्ता बाबत माहिती दिल्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुका हद्दीत काल दि 8 रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गा पासून हाकेच्या अंतरावर लालमाती येथे एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले होते.प्रथमदर्शनी गळा आवळलेला व मांडी जवळ भाजलेल्या स्थित मृतदेह आढळून आल्याने खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर कुठल्याच प्रकारची ओळख मिळु शकत नसल्याने पोलीसांकडून अनोळखी मृतदेहातील व्यक्ती कोण ? व त्याचा खून कोणी व का केला याबाबत चौकशी सुरु आहे.मृतदेहाच्या अंगावर टिशर्ट आणि अंडरपॅन्ट असून झाडाझुडुपांमध्ये मृतदेह फेकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.मृतदेहाच्या एका मांडीवर भाजल्याचे दिसून आले आहे.मात्र मयत ईसमाची ओळख पटत नसल्याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने मृतदेहाची ओळख पटवून दिल्यास व त्याचे मारेकरीचे नाव पत्ता बाबत माहिती दिल्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

माहिती कळविण्यासाठी खालील मो.क्रमांकांवर संपर्क साधावा
सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ मो.8788174193,9922887855
पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील
मो.9324549982
पोलीस हवलदार संजय सुर्यवंशी
मो.8830860754
संदीप ठाकरे
मो.7972095091

WhatsApp
Follow by Email
error: