बातमी कट्टा:- अवैध वाळू वाहतूकीवर दबंग महिला तलाठी यांंनी कारवाई करत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहे.रविवार सारख्या सुटीच्या दिवशी देखील एकट्या महिला तलाठी थेट कारवाईसाठी घटनास्थळी पोहचल्याने या महिला तलाठीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिरपूर तालुक्यातील वनावल जातोडे परिसरात रात्रीपासून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.याबाबत या परिसरातील महिला तलाठी रेणुका राजपूत यांना माहिती मिळाल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी तलाठी सकाळी एकट्या थेट वाळु वाहतूक सुरु असलेल्या परिसरात दाखल झालेत.हिंगोणी गावाजवळ अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर त्यांनी कारवाई केली.महिला तलाठी रेणुका राजपूत यांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.