बातमी कट्टा:- मका काढणीसाठी कणसे कापून शेतात गोळा करून ठेवले असतांना अज्ञात कारणाने अचानक मकाच्या कणासाच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने अंदाजे 105 ते 110 क्विंटल मका जळून खाक झाला.हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले.
शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड येथील शेतकरी निंबा आप्पा पाटील यांची उप्परपिंड शिवारात शेती आहे. त्यांनी शेतात मका पिकाची लागवड केली होती.मका काढण्यासाठी निंबा पाटील यांनी संपूर्ण मकाचे कणसे कापून शेतात गोळा केला होता.मात्र अचानक गोळा केलेल्या मकाच्या कणसाला आग लागली. काढणीसाठी कापून ठेवलेले 105 ते 110 क्विंटल मकाच्या कणसे जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ दाखल झाले मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते.ऐन तोंडा समोर आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याला डोळ्यात अश्रू आले.

