बातमी कट्टा:-शिरपूर शहर पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेली भोला छाप नामक सुंगधीत तंबाखू वाहतूक होतांना पकडली असून कार्यवाहीत 19 लाख 74 हजार रुपये किमतीची सुगंधीत तम्बाखुसह 20 लाख किमतीचे आयसर असा वाहनासह एकुण 39 लाख 74 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांंना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन पोसई/संदिप मुरकुटे यांनी डी. बी. पथकासह शहादा फाटा, कळमसरे शिवार ता. शिरपूर जि. धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडुन शिरपूरकडे येणारे आयसर वाहन क्र. यू.पी. ५३/ इ.टी.०२४१ असे ३.०० वाजेचे सुमारास शिताफीने पकडले असता सदर वाहनावरील चालक जमाल अली अहमद वय ४८ रा.नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि. फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश हा सदर वाहनात प्लॅस्टीक फिल्म मालाचे आडोशास १९,७४,०००/- रू. कि.ची भोला छाप सुगंधीत तम्बाखुचा माल भरलेले पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीक गोणटी असलेले ९ कार्टुन व पांढन्या रंगाचे प्लॅस्टीक गोणटी असलेले ४१४ कार्टुण असे एकुण ५० कार्टुण नेतांना मिळून आल्याने सदरचा माल महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत असल्याने सदर मालासह २० लाख किमतीचे आयसर वाहन क्र. यु.पी. ५३/ इ.टी. ०२४१ सह एकूण ३९ लाख ७४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात संशयित नामे जमाल अली अहमद वय ४८ रा. नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि. फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले असून सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, पोउनि / संदिप मुरकुटे, तसेच डी.बी.पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, लादूराम चौधरी, पोना/मनोज पाटील, पोकों/ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्निल बांगर, अमित रणमळे. मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटु साळुंके, प्रविण गोसावी तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी आदींनी केली आहे.