बातमी कट्टा:- 19 वर्षीय तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून तापी नदी पात्रातून बुडत असतांना मुलीला नदीच्या बाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र या दरम्यान तीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील शिवानी बाळु पाटील वय 19 या तरुणीने गिधाडे येथील तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.तापी नदीपात्रात बुडत असतांना घटनास्थळी प्रवासींनी बघितल्यानंतर तात्काळ शिवानी पाण्याबाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवानी पाटील हिचा मृत्यू झाला.
तीचे वडील बाळु पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार आज सकाळी 9 वाजता शिवानी पाटील सकाळी जवखेडा येथून परिक्षा देण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेली मात्र त्यानंतर तीने गिधाडे येथील तापीन नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कळाले होते.शिवानी हिने नुकतीच पोलीस भरतीची परिक्षा दिली होती.तीच्या आत्महत्याचे कारण मात्र मिळु शकलेले नसुन पुलावर बॅग आणि कॉलेजचे आयडी कार्ड मिळुन आले आहे.