बाळासाठी ती झाली रणरागिणी ! शिरपूरच्या हिरकणीचे बाळासाठी धाडस !!

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- बाळाला भुक लागली असेल आणि दुध पाजण्यासाठी हिरकणी हि स्त्री चक्क रायगड किल्ला उतरुन घरी गेली.आणि शिवरायांना हि माहिती मिळल्यानंतर तेथे हिरकणी नावाचा बुरुच रायगडावर बांधण्यात आला. इतिहासात आपल्या धाडसीपणामुळे नावारूपाला आलेली  हिरकणी या स्त्रीवर आधारित कविता आपण ऐकली किंवा वाचली असेलच !

बघा व्हिडीओ https://youtu.be/QQHwqgQT9U8

अशीच एक घटना नाशिक येथे घडली आहे. दीड महिन्याच्या बाळाला वाचविण्यासाठी जीव संकटात टाकून नाशिकची तृप्ती जगदाळे यांनी पुन्हा एकदा “हिरकणी” या इतिहासात आपल्या धाडसीपणामुळे नावारूपाला आलेली कवितेची आठवण करुन दिली.

On YouTube

तर झाल अस की, नाशिक येथील पेठ रोड भागातील २८ वर्षीय विवाहिता तृप्ती जगदाळे यांचे शिरपूर येथील माहेर असून त्या पेठ रोड येथे राहतात. पती गावी गेल्याने आपल्या दीड महिन्याचा बाळासोबत बिल्डिंग मधील फ्लॅटच्या घरात एकट्या होत्या झोळीत दीड महिन्याचा बाळ झोपायला टाकून तृप्ती जगदाळे यांनी घराचे कामकाज आटोपून कचरा टाकण्यासाठी त्या घराबाहेर गेल्या होत्या.मात्र या दरम्यान  अचानक जोराच्या हवा आल्याने मुख्यदरवाजा लॉक झाला.

On YouTube

घराबाहेर तृप्ती जगदाळे व घरात झोळीत दीड महिन्याचा मल्हार बाळ झोपलेला असल्यामुळे तृप्ती जगदाळे या कासावीस झाले.अनेक प्रयत्न करुन देखील दरवाजा उघडू शकला नाही. नेमके काय करावे ते समजले नव्हते.शेजारी देखील गावाला गेल्याने त्यांचे घर बंद होते तर मोबाईल आणि घराच्या चावी देखील घरातच होते.पुर्णता तारांबळ उडाली मात्र तृप्ती जगदाळे यांनी क्षणाचा हि विलंब न करता चौथ्या मजल्यावरच्या चार फुट ऊंच भिंतीची गॅलरीतून त्यांनी उडी मारुन मागच्या बाजुला असलेल्या फुटभर रुंदी असलेल्या ग्रीलच्या बाजुने तेथल्या पाईपच्या सहाय्याने आपल्या फ्लॅटच्या खिडकीपाशी पोहचली आणि पुन्हा चार फुटांची भिंतीवरुन उडी मारत आपल्या घरात शिरली.आधी बाळाला पोटाशी लावले अन् मग आतुन दरवाजा उघडला.आपल्या बाळासाठी जिव धोक्यात घालून हिरकणी बनत तृप्ती जगदाळे आपल्या मुलापर्यंत पोहचल्या.या चित्तथरारक घटनेची माहिती सर्वत्र पसरताच तृप्ती जगदाळे यांनी आपल्या बळासाठी जिव संकटात टाकून केलेल्या धाडसीपणामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: