बातमी कट्टा:- लग्नाकार्य निमीत्त बाहेर गावी गेले असतांनाच शॉर्टसर्कीट मुळे आग लागली आणि या आगीने शेजारच्या तीन घरांना आग लागल्याची घटना घडली असून यात दोन घरे संपूर्ण जळून खाक झाले तर दोन घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.यात अंदाजे एकुण 14 ते 15 लाखांचे नुकसान झाले आहे.
व्हिडीओ साठी लिंक क्लिक करा https://youtu.be/6FY5_z0bK2c
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे बळवंत दत्तात्रय मोरे हे लग्नानिमीत्त बाहेरगावी गेले होते.आज सकाळी त्यांच्या घरात शॉर्टसर्कीटमुळे आग लागली.यागीने भडका घेतल्याने शेजारी असलेल्या छोटू दत्तात्रय मोरे,राजेंद्र वासुदेव मोरे,भटु सिताराम मोरे यांच्या घराला आग लागली.यात सुदैवाने घरातील सदस्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतल्याने जिवीतहानी टळली.सुरुवातीला घरांमधून फक्त पांढरा धुर येत असल्याने आग नेमकी कोणत्या बाजूने लागली हे समजू शकत नव्हते.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
तात्काळ शिरपूर वरवाडे नगरपरिषदेची अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्यासह पथक दाखल झाले होते.यावेळी दोन घर संपूर्ण जळून खाक झाले तर घरातील संसारोपयोगी साहित्य व कृषी साहित्य जळून खाक झाले आहे.