बातमी कट्टा:- शिरपूर आमदार कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या ९ वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याणाचे व या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कडून राज्यभरात राबविले जाणारे महा जनसंपर्क अभियान याबाबत पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली.
या अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आ. काशीराम पावरा यांच्या नेतृत्वात वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार महा जन संपर्क अभियान राबविण्यात येत असून यात प्रामुख्याने विशाल रॅली ,ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन ,बुद्धिवंतांच्या संमेलन , घरोघरी संपर्क ,व्यापारी संमेलन, लाभार्थी संमेलन ,संयुक्त मोर्चा संमेलन, मतदार बुतस्तरीय संवाद, विकास तीर्थ ,योग दिवस, संयुक्त मोर्चा ,सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती मेळावा, पत्रकार परिषद व प्रभावशाली व्यक्तींची भेट इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविले जात आहेत.
त्या वेळी आमदार काशिराम पावरा म्हणाले की, नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी सरकारने गोरगरीब मध्यमवर्गीय,शेतकरी, महिला, तरुण तसेच इतरांसाठीही अनेक जनकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत. निवडणुकीदरम्यान दिलेल्या ८०टक्के वचनांची पूर्तता नऊ वर्षात केंद्र शासनाने केली. आगामी काळातही विकासाची घोड दौड अशीच सुरू राहणार आहे. गावपाड्यापर्यंत रस्त्यांचे जाळे विणले जात आहेत.वीज पोहचवली जात आहे. गोरगरीब व आदिवासी जनतेला विविध लाभाच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षाचा कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकास कामांची घोडदौड सुरु आहे. देशाचे नाव जग पातळीवर नेले. शेतकरी, गोरगरिबांच्या योजना केंद्राने फळदिल्या. त्याचा लाभ अनेक गरजूंना झाला त्यांचे जीवनमान सुधारले .मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विकास कामे सुरु आहेत. आगामी काळात केंद्र शासनाकडून जो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल यातून शिक्षण, आरोग्य यांसह मतदारसंघात पायाभूत सुविधा प्राधान्याने राबविण्यात येतील. अधिकाधिक विकास कामे करण्याच्या प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार काशिराम पावरा यांनी केले.
तसेच विधानसभा प्रभारी प्रभाकर चव्हाण यांनी मागील नऊ वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने प्रगती केले असून भारतीय पंतप्रधानाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव वाढला असून देशाला महासत्ता बनवण्याकडे वाटचाल सुरू असून देश प्रगतीपथावर असून कल्याणकारी योजनांच्या माध्यमाने गोरगरिबांना मदत दिली जात आहे असे म्हटले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क करून नऊ वर्षातील कार्यकाळातील मोदी सरकारची उपलब्धी व योजनांच्या आलेख नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले असून अभियान विधानसभा व लोकसभा मतदारसंघातून राबविण्यात येत आहे.
या वेळी आ.अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात आ काशिराम पावरा,शिरपूर विधानसभा प्रभारी प्रभाकर चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील,के.डी.पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आदी उपस्थित होते.