लाच स्विकारतांना मंडळाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

बातमी कट्टा:- शेतजमीनीच्या वाटणीसाठी १८ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार पैकी ८ हजार रुपये स्विकारुन आज ७ हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने मंडळाधिकारी यांना रंगेहाथ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तक्रारदार यांची मौजे भामरे ता. साक्री येथे गट नं. ४३ व गट नं. ४४ अशी शेत जमीन आहे.सदर शेत जमीनीची त्यांना त्यांचे मुलगा व पत्नी यांचेत नावे वाटणी करावयाची असल्याने त्यांनी निजामपूर भागाचे मंडळ अधिकारी विजय बावा यांची दि. २३/०३/२०२३ रोजी भेट घेतली असता तक्रारदार यांचे कडे शेत जमीन वाटणीचे काम करुन देण्यासाठी १८ हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी ८ हजार रुपये घेवून त्यांनी लागलीच काम करुन देतो असे सांगितले होते.परंतु अडीच महिने होवून देखील त्याचे शेतजमीन वाटणीचे काम झाले नसल्याने तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी विजय बावा यांची वेळोवेळी भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे उर्वरित १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने ला.प्र.वि.धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची दि. १६ जून रोजी पडताळणी केली असता मंडळ अधिकारी विजय बावा यांनी तक्रारदार यांच्याकडे शेतजमीनीची वाटणी करुन देण्यासाठी १८ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी या अगोदर स्विकारलेले ८ हजार रुपये वजाजाता उर्वरित ७ हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी करून दि. २१ जून रोजी मौजे भामेर ता. साक्री येथे तक्रारदार यांचे राहते घरी ७ हजार रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, वनश्री बोरसे, रोहीणी पवार, सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली आहे.सदर कारवाई साठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: