लाच स्विकारतांना कृषी विस्तार अधिकारी धुळे एसीबीच्या ताब्यात

बातमी कट्टा :-मंजूर झालेल्या विहीरीचे उर्वरित राहिलेले रक्कम 1 लाख 31 हजार रुपये बँक खात्यावर जमा झाल्याबद्दल 10 हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती 8 हजारांची लाच स्विकारतांना शिरपूर पंचायत समिती येथील कृषी विस्तार अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही उशीरापर्यंत सुरु होती.

तक्रारदार यांचे आईचे नावे मौजे वाकपाडा येथे असलेल्या शेत जमिनीवर जिल्हापरिषद व पंचायत समिती मार्फत राबवील्या जाणा-या बिरसा मुंडा कृषि योजने अंतर्गत नविन विहीरी साठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे विहीर मंजुर झाली आहे. सदर विहीरीचे खोदकाम व बांधकाम चालु केल्या नंतर वेळोवेळी झालेल्या कामाची पंचायत समिती कृषि विभागाकडुन पहाणी होवुन पहील्या हप्त्याची रक्कम मिळालेली आहे. त्यानंतर विहीरीचे उर्वरीत राहीलेले काम पुर्ण करून त्या झालेल्या कामाचे अनुदान बिलाबाबत विचारपुस करण्याकरीता तक्रारदार पंचायत समिती, ( कृषि विभाग ) शिरपुर येथे जावुन कृषि विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर भगवान पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना “तुझे आईच्या नावावर असलेल्या विहीरीच्या दुस-या हप्त्याचे बिलाचे काम केलेले आहे ते १ लाख ३१ हजार रुपये त्यांचे खात्यावर जमा झाले आहे. त्याच्या मोबदल्यात मला १०,०००/- रुपये द्यावे लागतील, पैसे काढल्यावर तु मला भेटायला ये” असे सांगुन लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि. २१.०६.२०२३ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथील पथकाने शिरपुर येथे जाऊन दि. २१/०६/२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान कृषि विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे आईचे नावे असलेल्या शेत जमिनीवर बिरसा मुंडा कृषि योजने अंतर्गत मंजुर नविन विहीरीचे खोदकाम व बांधकामाचे दुस-या हाप्त्याचे १ लाख ३१ हजार रुपये बिलाचे काम केल्याचे मोबदल्यात तडजोडी अंती ८ हजार रुपये पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम घेवुन येण्यास सांगीतले होते. त्याप्रमाणे आज दि. २२ जूं रोजी विस्तार अधिकारी कृषि विभाग पाटील यांनी शिरपुर शहरातील हॉटेल ग्यानमाई चहा व नाश्ता सेंटर येथे तक्रारदार यांच्या कडुन ८ हजार रुपये लाच स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक शअभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, रोहीणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: