बातमी कट्टा:- एम फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तीन दिवसापूर्वी रुममधून बेपत्ता असता त्याचा शोध सुरु असतांना तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील राहुल नामदेव पाटील वय 22 हा शिरपूर येथील आर.सी पटेल फार्मसी महाविद्यालयात एम फार्मचे पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.गेल्या चार वर्षांपासून तो शिरपूर येथे शिक्षण घेत होता.दि 21 रोजी त्याचे एम फार्मची परिक्षा होती.मात्र तो आजारी असल्याने त्याने पेपर दिला नव्हता.दि 21 रोजी सायंकाळी रुममध्ये अभ्यास करत असतांना तो करवंद नाका येथून रिक्षा स्टॉप जवळ गेला व तेथून बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध सुरु असतांना राहुल कुठेही मिळुन आला नाही.आज दि 23 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याचा शोध सुरु असतांना सावळदे गावाजवळील तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला.त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार होत.त्याचे आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.