बातमी कट्टा:- भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांच्या हस्ते एस. व्ही. के. एम. मुंबई संचलित श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीचे शानदार उद्घाटन संपन्न झाले.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तसेच माजी मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली अत्याधुनिक कॉम्पुटराइज्ड अशा श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ संचलित श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीचा 23 जून 2023 रोजी आर. सी. पटेल फार्मसी संकुल, करवंद नाका शिरपूर येथे झाला.
यावेळी गोवा खासदार विनय तेंडुलकर, संसदरत्न खा. डॉ. हिना गावित, महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल, भाजपा प्रदेश महासचिव विजय चौधरी, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, तळोदा आमदार राजेश पाडवी, एस. व्ही. के. एम. मुंबई संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, एस. व्ही. के. एम. संस्थेचे उपाध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल, एस. व्ही. के. एम. संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, संस्थेतील विविध शाखांचेे प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कल्पकतेतून व दूरदृष्टीतून शिरपूरकरांसाठी चार मजली सर्व सुविधांनी युक्त, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्याधुनिक ई-लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबद्दल यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी सेंट्रल लायब्ररी मधील सोयीसुविधा पाहून आनंद व्यक्त केला. त्यानंतर शिरपूर आमदार कार्यालयात भेट देऊन शिरपूर तालुक्यातील जनतेसाठी सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘विकास योजना आपल्या दारी अभियान’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमां बद्दल कौतुक केले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे एस. व्ही. के. एम. सांस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, ट्रस्टी राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

