बातमी कट्टा:- देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर शिरपूर तालुक्यात आमदार अमरीशभाई पटेल हे खऱ्या अर्थाने प्रभावशाली व भाग्यविधाते आहेत. भाईंची नागरिकांप्रती असलेली तळमळ व काम करण्याची धडाडीची पद्धत पाहून आनंद वाटतो. अमरिशभाई आपण शिरपूरचे भाग्य बदलले आहे, आपण शिरपूर चे भाग्य विधाते आहात.असे भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी गौरवोद्गार केले.
भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षे कार्यकाळात देशवाशियांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून फार मोठे कार्य केले आहे. जागतिक पातळीवर भारत देशाला प्रगतीपथावर नेले असून ही बाब सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. काल अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांचा विशेष सन्मान करण्यात आल्याने जगाला मोदीजींच्या प्रभावी नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली. मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारत 5 वी अर्थ व्यवस्था बनली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी देशवासियाना घरे मिळाली असून 1 कोटी नागरिकांना घरे बांधण्याचे काम सुरू आहे. गोरगरीबांना न्याय देण्यात येऊन केंद्र शासनाच्या माध्यमातून असंख्य योजना गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांना ऊर्जा देण्याचे काम केले आहे.
व्यापारी, शेतकरी सर्वांसाठी मोदीजीनी कोविड काळात मोठे कार्य केले. जीएसटी व टॅक्स मुळेच अर्थ व्यवस्था मजबूत झाली. मंदिर निर्माण कार्य सुरु केले तर 370 कलम हटवले. देशाला, प्रदेशाला मोदीजी यांची गरज आहे असे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा च्या 9 वर्षे यशस्वी कार्यकाळातील सेवा, सुशासन व गरीब कल्याण महासंपर्क अभियान अंतर्गत व्यापारी व कार्यकर्ता मेळावा आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील “राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल” मध्ये 23 जून 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तसेच माजी मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, गोवा खासदार विनय तेंदुलकर, संसदरत्न खा. डॉ. हिना गावित, महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल, भाजपा प्रदेश महासचिव विजय चौधरी, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, तळोद्याचे आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल, शिरपूर विधानसभा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, विक्की चौधरी, आकाश मराठे, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक,महिला, पुरुष, युवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल आम्हाला मनापासून अभिमान आहे शिरपूर तालुक्यात असंख्य योजना राबवून हजारो नागरिकांना मी प्रत्यक्ष लाभ दिला. तालुक्यात 12 हजार वनपट्टे दिले असून 4500 प्रकरणे बाबत अपिल सुरु आहे. 17 हजार कामगार बांधवांना शासकीय योजनेच्या लाभ, निराधार अपंग 32 हजार लाभार्थी योजना मंजूर, सर्व विधवा भगिनींना प्रत्यक्ष लाभ, कोविड काळातील मयतांच्या नातेवाईकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला तर 60 हजार आयुष्मान कार्ड रजिस्टर करून त्यांनाही लाभ मिळवून दिला आहे. शिरपूर पॅटर्न मार्फत 350 बंधारे मी बांधले असून 1लाख एकर जमीन सिंचनाखाली आणली. पाणी थंबवायचे काम आम्ही करत आहोत. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शाळा, कॉलेज मधून रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात येत आहे. हजारो लोकांना रोजगार, 1 लाख लिंब झाड, शहरात पिण्याचे पाणी विना मोटर जाते, अशी विविध कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. एस. व्ही. के. एम. मार्फत 1 हजार बेडचे हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर असून शैक्षणिक संस्था मार्फत देशभरात शिरपूर, मुंबई, नवी मुंबई, बेंगलोर, धुळे, इंदोर, हैदराबाद, चंदीगड, अहमदाबाद अशा विविध ठिकाणी दर्जेदार कॅम्पस उभारले आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररी’ मार्फत हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
यावेळी खा. डॉ. हिनाताई गावित म्हणाल्या, भाई हे मोठे नेतृत्व आमच्या सोबत असल्याचा आनंद आहे. केंद्र शासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सर्वत्र प्रभावीपणे सुरु आहे. उज्वला गॅस योजनेचे काम प्रभावीपणे करण्यात आल्याचा मनापासून आनंद आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी केले.