बातमी कट्टा:-वाढती चोरी,घरफोडी रोखण्यात शिरपूर पोलीसांना अपयश आले आहे असेच म्हणावे लागेल कारण यामुळेच कदाचित चोरांची शिरपूर शहरात दहशत वाढली आहे.आज तर चक्क शिरपूर शहरातून दोन चारचाकी वाहन चोरी झाल्या आहेत तर एक चार चाकी वाहनाची चोरीचा प्रयत्न झाला आहे.यामुळे शिरपूरात चाललय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील भरवस्तीतून दोन चारचाकी वाहन चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या तर एक चारचाकी वाहन चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी शिरपूर शहरातील सुभाष कॉलनी येथून भरदिवसा घरफोडी होऊन लाखोंचा ऐवज चोरी झाली होती.आज पुन्हा सुभाष कॉलनी येथे अक्षय विजय चौधरी यांची एम एच 39 जे 8781 क्रमांकाची इनोव्हा क्रेष्टा चोरी झाल्याची घटना घडली.याच कॉलनीत विरपाल गोकुळसिंग राजपूत यांची एम एच बि एच 7009 क्रमांकाची हुंडाई वेन्यु या चारचाकी वाहनाची चारचाकी वाहनाची चोरीचा प्रयत्न झाला आहे.या चारचाकी वाहनाच्या मागच्या दरवाजाचे काच फोडण्यात आले आहे तर वाहनाचे लॉक खराब केल्याचे दिसत आहे. याच दरम्यान शिरपूर शहरातील केजी नगर येथील दर्शन राजेंद्र जैन यांची एम एच 18 बिसी 9817 ही टेवंटी चारचाकी वाहन चोरी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेची सिसिटीव्ही कॅमेऱ्यात व्हिडीओ चित्रीत झाला आहे.
एकाच रात्रीत शहरातून दोन चारचाकी वाहन घरासमोरून चोरी झाल्याने व एका चार चाखी वाहनाची चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरातील जनता भयभीत झाली आहे. शहरात वाढत्या चोरी घरफोडी नंतर आता चक्क दोन चारचाकी वाहन चोरी झाल्याने शहरात चोरांची दहशत वाढली असून याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी का लक्ष देत नाहीत ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.