
बातमी कट्टा:- सिक्कीम येथे कर्तव्यावर असतांना पाय घसरल्याने दरीत कोसळल्याने भारतीय सैनिक मनोज संजय माळी हे शहीद झाल्याचे दोन दिवसापूर्वी समजले होते.त्यांच्यावर आज दि 9 रोजी सकाळी शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिक्कीम येथे कर्तव्यावर असतांना पाय घसरून दरीत कोसळल्याने भारतीय सैनिक मनोज संजय माळी हे शहीद झाले.त्यांच्यावर आज रविवारी सकाळी धुळे जिल्ह्यातील वाघाडी ता.शिरपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, याबाबतची वाघाडी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहीद जवान मनोज माळी यांचे पार्थिव सिक्कीम येथून रात्री विमानाने संभाजीनगर येथे आणण्यात आले व तेथून पहाटे प्रवास करून शहीद जवान मनोज माळी यांचे पार्थिव आज सकाळी शिरपूर येथे दाखल झाले.शिरपूर येथील करवंद नाका, निमझरी नाका मार्गे शहीद जवान मनोज माळी यांचे पार्थिव वाघाडी येथे दाखल होऊन वाघाडी येथील बोराडी रस्त्यावरील मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी अविवाहीत असताना मनोज माळी देशसेवेत शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.संपूर्ण शहरासह वाघाडी येथे सर्वत्र तिरंगांसह मनोज माळी “अमर रहे” असे बँनर लावण्यात आले आहेत.
