शहीद जवान मनोज माळी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय वाघाडीत दाखल

बातमी कट्टा:- भारतीय सैनिक शहीद मनोज माळी यांचे पार्थिव वाघाडी येथील घरापासून अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले यावेळी जिल्ह्यातील नागरिकांची प्रचंड गर्दी बघावयास मिळाली.

सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास शहीद जवान मनोज माळी यांचे पार्थिव शिरपूर येथील करवंद नाका येथे पोहचले तेथून त्यांच्या राहत्या घरापर्यंत पोहचले. यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.अमर रहे अमर रहे च्या घोषात संपूर्ण वाघाडी गहीवरले होते.वयाच्या 25 व्या वर्षी देशासाठी बलीदान दिलेले शहीद जवान मनोज माळी यांंचे पार्थिव वाघाडी येथील घरापासून बोराडीरस्त्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करण्यात आली होती.

WhatsApp
Follow by Email
error: