
बातमी कट्टा:- बिल्डिंग अपारमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील बंद घरात चोरी करून पसार होत असतांनाच शेजारांना समजले त्यांनी आरडाओरड केल्यानंतर संशयित चोर अपार्टमेंटच्या छतावर पळाला.तेथेही नागरिक येत असल्याचे बघून संशयित चोराने थेट छतावरून खाली पत्राच्या शेडवर उडी मारली.यावेळी संशयित जखमी झाला तर त्याच्या सोबतचा साथीदार पसार झाला.जखमी अवस्थेत पोलीसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.त्याच्याकडे असलेली रोकड व सोने चांदीच्या दागिन्यांची पिशवी पत्राच्या शेडवर मिळुन आली.राहुलसिंग प्रधानसिंग सिकलकर रा. नंदुरबार असे संशयिताचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोंडाईचा येथे शिववंदना आपारमेंट या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणारे तुषार विकास सारडा वय 26 हे धार्मिक कार्यक्रमासाठी पाळधी जि.जळगाव येथे गेले होते.दि 9 रोजी पहाटेच्या सुमारास बंद घर बघून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी तोडून आत प्रवेश केला. घरातून 34 हजार 300 रुपये रोख व सोने चांदीचे दागिने असा एकूण 61 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरी करून संशयित पसार होत होता हा संशयित सारडा यांच्या शेजारच्यांना दिसताच त्यांनी आरडाओरड केली त्यानंतर संशयित बिल्डिंगच्या छतावर पळाला नागरिक येत असल्याचे समजल्याने त्याने थेट छतावरून बिल्डिंगच्या मागील बाजूच्या कंपाउंड लगत असणाऱ्या लालसिग गिरासे यांच्या पत्राच्या शेडवर उडी मारली यात तो जखमी झाला त्याची दुचाकी अपार्टमेंट जवळच मिळून आली तर त्याचा साथीदार मात्र पळून गेला जखमी चोरट्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत तुषार सारडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुलसिंग शिकलकरसह साथिदारावर दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.